शहर भाजपा तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त अभिवादन

सांगली :- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य, क्रांतिकारी विचारवंत, साहित्यिक, कवी, लोककथाकार, प्रबोधनकार आणि समाजसुधारक असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्यावर प्रकाश टाकत त्यांना अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे हे वंचित, श्रमिक, दलित, भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनाचे बोलके प्रतिनिधी होते. त्यांच्या सर्जनशील लेखणीतून ‘फकिरा’ सारख्या क्रांतिकारी कादंबऱ्या, पोवाडे, लोककथा आणि कथालेखन निर्माण झाले, ज्यामुळे जनतेला अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी रचलेली गीते, लोकनाट्यं आणि लोकवाङ्मय साहित्याच्या माध्यमातून समाजात नवचैतन्य निर्माण करणारी ठरली. या अभिवादन कार्यक्रमात भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश तात्या बिरजे, भाजपा नेते श्रीकांत शिंदे, माजी नगरसेवक सुबराव मद्रासी, अप्सरा वायदंडे, अनुसूचित जाती प्रदेश सचिव प्रदीप कांबळे, प्रियानंद कांबळे, राजू पठाण, सुजित काटे, रवींद्र सदामते, मंडलाध्यक्ष राहुल नवलाई, अर्जुन मजले आदी पदाधिकारी उपस्थित होते.