एनसीसी कॅम्प मध्ये चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे यश.

सांगली :- 16 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सांगली तर्फे 24 मे ते 2 जून या कालावधीत शांतिनिकेतन प्रशाला सांगली येथे CATC/309 हा कॅम्प घेण्यात आला त्यामध्ये विविध स्पर्धांमध्ये चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. SUO प्रतीक्षा पाटील हिने कंपनी सीनियर बेस्ट कॅडेट, अँकरिंग, गार्ड ऑफ ओनर, सेल्फ डिफेन्स डेमो, एसे रायटिंग, सर्टिफिकेट रायटिंग इत्यादी मध्ये गोल्ड मेडल मिळवले. तसेच ग्रुप सॉंग आणि ग्रुप डान्स मध्ये सिल्वर मिडल मिळवले. कॅडेट पियुषा देशपांडे हिने कबड्डी आणि एसे रायटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवले तसेच ग्रुप डान्स मध्ये सिल्वर मेडल मिळवले. कॅडेट प्रज्ञा शेषवरे हिने रस्सीखेच मध्ये गोल्ड, थ्रो बॉल मध्ये सिल्वर मेडल मिळवले. कॅडेट योगिता मोरे हिने ग्रुप डान्स मध्ये गोल्ड, DST ड्रिल मध्ये सिल्वर मेडल मिळवले. कॅडेट चैत्राली कांबळे हिने ग्रुप सोंग मध्ये गोल्ड मेडल मिळवले. कॅडेट वैष्णवी हनगडी हिने कबड्डीमध्ये गोल्ड मेडल मिळवले. कॅडेट प्रीती बिरादार हिने ग्रुप सॉंग मध्ये गोल्ड मेडल मिळवले. कॅडेट हर्षदा शिनगारे हिने ग्रुप सोंग मध्ये गोल्ड मेडल मिळवले. कॅडेट दिया शिंदे हिने ग्रुप डान्स मध्ये गोल्ड मेडल मिळवले. कॅडेट हर्षदा गुरव हिने थ्रो बॉल मध्ये सिल्वर मेडल मिळवले. कॅडेट सुशांत इंगळे ह्याने फायरिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवले. कॅडेट प्रथमेश गोरनाळ याने कबड्डीमध्ये गोल्ड मेडल मिळवले. सर्व कॅडेट्सना 16 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सांगली चे कमांडिंग ऑफिसर कर्नल साठे तसेच एडमिनिस्ट्रेशन ऑफिसर कर्नल बर्वे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व कॅडेट्सचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ब्रह्मनाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंभार, सुपरवायझर प्रा. नागरगोजे, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट सुनील कोपार्डे यांनी सर्व कॅडेट्सचा सत्कार व अभिनंदन केले.