शैक्षणिक धोरणाविरोधात सांगलीत धरणे आंदोलन

सांगली प्रतिनिधी :- राज्य सरकारने राबविलेल्या शैक्षणिक धोरण व खासगी नोकर भरती विरोधात प्रागतिक पक्ष आघाडीतर्फे स्टेशन चौक महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात प्रागतिक पक्षातील शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, जनता दल सेक्युलर, कमुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या आंदोलनात सरकारने काढलेले वरील दोन्हीही जी.आर ताबडतोब रद्द करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार प्रा.शरद पाटील, काँगेस नेते विशाल पाटील, शेकापचे ॲड. सुभाष पाटील, ॲड. अजित सूर्यवंशी , समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर, प्रा. बाबूराव लगारे, कॉ. नंदकुमार हत्तिकर, कॉ. धनाजी गुरव,भाई दिनकर कांबळे, ॲड. तेजस्विनी सुर्यवंशी, ओबीसी मोर्चाचे सुनील गुरव, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष महेश खराडे , जनार्दन गोंधळी , कॉ.सतीश लोखंडे , समाजवादीचे आबासाहेब गडदे , समाजवादीचे डॉ. प्रमोद दीप, सदानंद शिंदे, प्रहारचे मुनीर मुल्ला ,प्रकाश बंडगर, कॉ. संदीप कांबळे उपस्थित होते.