कर्तबगार आणि कर्तुत्ववान कर्मचारी बँकांबरोबर राहण्यासाठी सातत्याने प्रोत्साहनपर नवनवीन उपक्रम राबवावेत – शरद गांगल

सांगली प्रतिनिधी :- सहकार भारती सांगली महानगर शाखा, सांगली अर्बन को – ऑप बँक ली, सांगली जिल्हा अर्बन बँक असोसीएशन, गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सांगली अर्बन बँकेच्या स्व.म.ह तथा अण्णा गोडबोले सभागृह येथे अर्बन बँकांचे अध्यक्ष,संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक यांचेसाठी कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. पहिल्या सत्रात “ Leadership Challeneges in Co-op Banking “ या विषयावर सहकार भारती भारती बँक प्रकोष्ठ प्रमुख आणि ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री.शरद गांगल यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले सहकारी बँकामध्ये मनुष्यबळाचे महत्व आणि उपयोगिता मोठया प्रमाणात वाढलेली आहे. सहकारी बैंकांचे फक्त फायनानशियल ऑडिट होत नाही तर त्यांचे सोशल ऑडीटही होत असते. त्यामुळे आपल्याला फार काळजीपूर्वक रहावे लागते. कर्मचारी वर्गाच्या योगदानामुळे बैंकींग सेवेचा विस्तार होत असतो. त्यामुळे कर्तबगार आणि कर्तुत्ववान कर्मचारी बैंकांबरोबर राहण्यासाठी सातत्याने प्रोत्साहनपर नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत. कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षणाची आवश्यकता असते ते पूर्ण केले पाहिजे. कर्मचारी प्रशिक्षणावर होणारा खर्च हा खर्च नसून ती गुंतवणूक आहे असेही यावेळी बोलताना ते म्हणाले. यापुढे बोलताना ते म्हणाले सहकारी बँका रिलेशनशीप मॅनेजमेंटवर टिकून आहेत. यासाठी त्या ठिकाणचा सेवकवर्ग दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. बँकेच्या अध्यक्षांनी वारंवार किंवा रोजच बैंकेकडे जाणे आवश्यक नाही. सीईओंवर जबाबदारी टाकली पाहिजे. त्याचबरोबर, दोन टर्मची मर्यादा असल्यामुळे पुढचे संचालक कोण असतील याचाही विचार करून ठेवणे गरजेचे आहे असे श्री.गांगल म्हणाले. यानंतर बोर्ड ऑफ अ‍ॅप्रेंटनशीप ट्रेनिंग (मुंबई) चे डेप्युटी डायरेक्टर डॉ.एन.एन वडोदे यांनी अ‍ॅपरेंटीशिप स्कीम व त्यांचे बँकांना फायदे या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. यानंतर गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. राजन पडवळ व रीसोन्स सोल्युशन्सचे श्री. विवेक सिनारे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य आणि सहकार भारतीचे प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय सहकार भारतीचे महानगर संघटन प्रमुख संदीप कुलकर्णी आणि प्रचार प्रमुख अवधूत ठोके यांनी करून दिला. सूत्रसंचालन महामंत्री शैलेश पवार यांनी केले. आभार सहकार भारतीचे महानगर बँक प्रकोष्ठ प्रमुख आणि सांगली अर्बन बँकेचे संचालक सागर घोंगडे यांनी मानले. यावेळी सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, माजी अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील, अमरसिंह देशमुख, सहकार भारतीचे महानगर अध्यक्ष शशिकांत राजोबा, महेश्वर हिंगमिरे, सांगली अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक व संचालक मंडळ यांचेसह सांगली जिल्ह्यातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बैंकांचे अध्यक्ष, संचालक, सीईओ आदि उपस्थित होते