विजयनगर गणपती मंदिर येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

सांगली प्रतिनिधी :- विजयनगर पूर्व येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे अयोध्या मधील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभू श्रीराम चंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आली. यादिवशी कार्यक्रमांमध्ये गुरुकृपा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, श्री राम रक्षा पठण आणि अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. तसेच प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी प्रभागामधील माजी नगरसेविका सोनालीताई सागरे, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, बाळासाहेब खुडे, संदीप कुलकर्णी, महेश सागरे,संजय चव्हाण,माधव कपिलेश्वर, सी.एस कुलकर्णी, ओमकार पोतदार, अमित पंडित, अथर्व कपिलेश्वर,राजू कठारे, अप्पासाहेब बळगानुर,श्री चोपडे काका, सिद्धलिंग मरनूर तसेच मारुती मंदिर ट्रस्ट मधील महिला संचालक व परिसरातील भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महेश सागरे, बाळासाहेब खुडे, अथर्व कपिलेश्वर आदि यांनी केले.