इतिहास संशोधक रावबहादूर द.ब पारसनीस चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

पुणे प्रतिनिधी ( जितेंद्र दळवी ) :- एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या संधिकालात ऐतिहासिक साधनांना उजेडात आणून, त्यांचे संस्थात्मक पद्धतीने जतन करून शिवाय स्वतंत्र दृष्टीने साधार इतिहास लेखन करणारे दत्तात्रेय बळवंत पारसनीस हे एक जागतिक दर्जाचे इतिहासकार होते, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील थोर इतिहास संशोधक रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस, चरित्र आणि कार्य ‘ या ग्रंथाचे प्रकाशन रविवार दि.२७ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते डेक्कन जिमखाना क्लब हॉल,पुणे येथे झाले. या ग्रंथाचे लेखक रावबहादूर पारसनीस यांचे नातू डॉ. सुरेंद्र श्रीकृष्ण पारसनीस त्यांनी या ग्रंथ लेखनाबद्दल त्यांची भूमिका विशद केली. तसेच ते आजच्या तरुण वर्गाला हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल असे सांगितले. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी लेखक डॉ. सुरेंद्र पारसनीस, सौ. सुनिता पारसनीस, डॉ. सुधांशु गोरे, डॉ. रवींद्र पारसनीस आदि उपस्थित होते.